Tuesday, April 30, 2024

Latest Posts

लालबागच्या राजाच्या दरबारी ‘या’ तारखेला रंगणार सोन्या-चांदीच्या वस्तूंचा लिलाव

नवसाला पावणारा बाप्पा’ अशी ख्याती असलेल्या मुंबईतील प्रसिद्ध ‘लालबागच्या राजा’ च्या दर्शनाला देशभरातून भक्तांची रांग लागते. यंदा ‘लालबागचा राजा’च्या चरणी भक्तांनी १० दिवसात कोट्यवधींचं दान जमा केलं आहे. फक्त मुंबईच नव्हे तर अगदी परदेशी पाहुणेही ‘लालबागचा राजा’चा थाट बघण्यासाठी गर्दी करतात.

एमसीए निवडणुकीत शरद पवार यांचा संदीप पाटील, राजू कुलकर्णी यांना आशीर्वाद

गेली दोन वर्ष कोरोना काळ असल्यामुळे भक्तांना लालबागच्या राजाचं ऑनलाईन दर्शन घ्यावं लागलं होते. दोन वर्षाच्या ब्रेक नंतर लालबागच्या राजाच्या दर्शनला जाणाऱ्याची संख्या अधिक आहे. संपूर्ण १० दिवसांत लाखो गणेशभक्तांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. यामध्ये रोख रकमेसह नाण्यांचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात सोने, चांदी देखील भक्तांनी अर्पण केली आहे. जवळपास २५० तोळे सोनं आणि २९०० तोळे चांदीचं दान लालबागच्या राजाच्या दानपेटीत अर्पण करण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा : 

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक ‘या’ दिवशी होणार

तर उद्या १५ सप्टेंबर २०२२ रोजी लालबागच्या राजाच्या चरणी गणेशोत्सवादरम्यान भाविकांकडून अर्पण करण्यात आलेल्या सोन्या चांदीच्या वस्तूंचा जाहीर लिलाव होणार आहे. सायंकाळी ठीक पाच वाजल्यापासून ते रात्री ठीक दहा वाजेपर्यंत लालबागच्या राजाच्या मंडपात आयोजित करण्यात आले आहे.

मुंबईतल्या लालबागच्या राजाच्या दानपेटीत गणेशभक्तांकडून जितकं सढळ हातानं दान करण्यात येतं, तितक्याच सहजतेनं काही भक्त आपलं मनही देवाकडे मोकळं करत असतात. ही भक्तमंडळी दरवर्षी लालबागच्या राजाला पत्र लिहून गाऱ्हाणं मांडत असतात.

सांगलीत मनपा स्थायी सभापतीपदी निवडणुकीत भाजपचा विजय तर, काँग्रेसच्या पदरी अपयश

Latest Posts

Don't Miss