Saturday, April 27, 2024

Latest Posts

काखेत घाम आणि दुर्गंध येत असेल तर हे उपाय नक्की ट्राय करा

उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे काखेत येणारा घाम आणि दुर्गंधी त्यामुळे होणारे इन्फेकशन आणि येणारी खाज यावर काही उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे काखेत येणारा घाम आणि दुर्गंधी त्यामुळे होणारे इन्फेकशन आणि येणारी खाज यावर काही उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. उन्हाळ्यात दिवसभर बाहेर असल्यामूळे आपल्याला उन्हामुळे खूप घाम येतो. ही एक सर्वसामान्य गोष्ट आहे. शरीराच्या इतर भागापेक्षा आपल्याला काखेत जास्त घाम येतो आणि त्यामुळे त्या भागातून दुर्गंध सुद्धा येतो. काखेत येणाऱ्या घामामूळे आपण इतरांसमोर हाथ वर देखील करायला घाबरतो. अनेकांना वाटत घाम आल्यामुळे आपल्या काखेतून दुर्गंध येतो परंतु दुर्गंध हा आपल्या काखेत जमा झालेलं बॅक्टेरिया मुळे येतो आणि त्यामुळे आपल्याला त्या भागात खाज येते.

यासाठी उपाय म्हणून बरेच जण परफ्युम किंवा दुर्गंधी नाशक द्रव्य यांचा वापर करतात. पण यांचा जास्त वापर केल्यामुळे आपल्याला काखेत साईड इफेक्ट होण्यास सुरुवात होते. परफ्युमचा सुगंध हा काही वेळे पुरताच असतो, मात्र जास्त वापर केल्यावर काखेत काळा थर निर्माण होण्यास सुरुवात होते आणि काख काळी पडू लागते. यावर उपाय म्ह्णून आपल्या घरात सहज उपलब्ध असणारे डीआयवाय उपाय करून आपण काखेतील काळेपणा आणि दुर्गंधी दूर करू शकतो. या उपायांमुळे आपल्या काखेत येणारी खाज कमी होईल, काळेपणा दूर होईल आणि दिवसभर फ्रेश वाटेल.

हायजीनची काळजी घेणे –

काखेतून दुर्गंधी येणे याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या शरीराची स्वच्छता नीट नसणे. आपण अंघोळ करताना अनेकदा आपल्या सर्व अवयवांची नीट स्वछता करत नाही आणि हे चुकीचे आहे. अंघोळ करताना आपण अंडरआर्म्स साबणाने स्वच्छ साफ केले पाहिजे.

हलक्या आहाराचे सेवन करणे –

उन्हाळ्यामध्ये आपल्याला हलक्या आहारचे सेवन केले पाहिजे. जास्त गरम खाल्याने त्याचा परिणाम थेट आपल्या त्वचेवर होत असतो. नारळपाणी, ज्यूस, फळे, पाणी, ताक अशा पेयांचे सेवन जास्त केले पाहिजे, त्यामुळे आपले शरीर आतून थंड राहते.

योग्य परफ्युम वापरा –

आपण काही वेळेस परफ्युम जास्त चांगल्या सुगंधामुळे घेतो, परंतु त्यामध्ये असणाऱ्या रसायनामुळे आपल्या त्वचेवर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. परफ्युम शक्यतो दुसऱ्यांचा वापराने टाकावे. परफ्युम थेट त्वचेवर वापरू नये, तो कपड्यांवर वापरावा.

फिट कपडे घालणे टाळा –

उन्हाळ्यात सैल व सुती कपड्यांचा जास्त वापर करा. फिटिंग कपडे किंवा शरीराला चिकटणारे कपडे घातल्याने शरीराला श्वास घेता येत नाही आणि त्यामुळे आपल्या काखेत घाम आणि दुर्गंध येतो.

हे ही वाचा : 

युनेस्कोला बारसूमध्ये कातळ शिल्प सापडली

राज ठाकरेंनी केली मुंबई -गोवा महामार्गाची समृद्धी महामार्गासोबत तुलना

Raj Thackeray यांचा शरद पवरांवर निशाणा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवार घेत नाहीत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss