Friday, April 26, 2024

Latest Posts

गव्हाचे-डाळीचे पीठ लवकर खराब होतय ? करा ‘हे’ उपाय, पीठ अजिबात खराब होणार नाही,टिकेल ही जास्त काळ!

उन्हाळा ओसरत असून पावसाळा तोंडावर आला आहे. याच सोबत पावसाळ्यात घरात ठेवलेले धान्य तसेच पीठ खराब होते. व यात किडे पडू लागतात.

उन्हाळा ओसरत असून पावसाळा तोंडावर आला आहे. याच सोबत पावसाळ्यात घरात ठेवलेले धान्य तसेच पीठ खराब होते. व यात किडे पडू लागतात. पावसाळ्यात धान्य व पीठ जास्त काळ साठवून ठेवणे आपल्यासाठी मोठी समस्या बनते. पीठ किंवा धान्य चांगले ठेवले नाही तर त्यात पोरकीडे तसेच अळ्या होतात. त्यामुळे खराब झालेले पीठ आपल्याला नाविलाजाने फेकून द्यावे लागते. पावसाळ्यात ध्यान व पीठ साठवणे जबाबदारीचे काम असते. खराब झालेले पीठ आपल्या शरीरात गेल्याने आरोग्या वर मोठ मोठे दुष्परिणाम उद्भवतात. तसेच जीवावर सुद्धा बेतू शकते. त्यामुळे हे पदार्थ सुरक्षित ठेवणे आवश्यक असते. म्हणूनच आज आम्ही तुमच्या साठी काही अश्या टिप्स घेऊन आलो आहोत कि ज्याने पीठ व धान्य पावसाळ्यात हि सुरक्षित राहील. चला तर मग जाणून घेऊयात नेमके कोणते उपाय करावे.

मीठाचा वापर करावा –

धान्य व पीठ खराब होऊ नये व दीर्घकाळ टिकण्यासाठी त्यात समुद्री मिठाचे खडे मिसळावे. २० किलो पीठ असेल तर यात ८ ते १० चमचे मीठ मिसळावे. मीठ मिसळल्याने धान्य व पिठाला किडे लागत नाहीत. एका मोठ्या भांड्यात पीठ घेऊन त्यात मीठ मिसळावे व पुन्हा त्यात पीठ टाकावे.असे केल्याने पीठ जास्त काळ टिकते.

स्टिलच्या डब्यात ठेवावे –

प्लॅस्टिकच्या पिशवीत कधीही पीठ साठवून ठेवू नये. प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये पीठ ठेवल्याने त्यात ओलावा येतो व त्यामुळे पीठ लवकर खराब होते. म्हणून, पीठ दीर्लकाळ साठवण्यासाठी स्टिल च्या डब्याचा वापर करावा. पीठ साठवताना स्टिल चा डब्बा पूर्णपणे कोरडा असेल याची काळजी घ्यावी.

सुकी मिरची आणि तेजपत्ता या पदार्थांचा वापर करावा –

काही लोकांना पिठात मीठ आवडत नाही, त्यामुळे पीठ साठवताना जर मीठाचा वापर करायचा नसले तर आपण सुक्या मिरच्या आणि तमालपत्र या पदार्थांचा वापर करू शकतो. पीठ साठवताना त्यात १० ते १५ सुख्या मिरच्या व तमाल पत्र घातल्याने पिठात पोरकिडे होत नाहीत.

फ्रिजमध्ये ठेवावे –

पीठ फ्रिज मध्ये ठेवल्याने ते ४ ते ५ महिने टिकते. फ्रिज मध्ये ठेवताना पीत छोट्या भांड्यात ठेवावे. जास्त दिवसांसाठी कुठेही बाहेर जात असाल तर पीठ फ्रीजमध्ये ठेवावे.जेणेकरून पीठ खराब होणार नाही.

ध्यान्य खराब न होण्यासाठी सोप्या गोष्टी –

धान्य खराब न होण्यासाठी ते आधी कडक उन्हात ठेवावे व नंतर डब्यात साठवावे. त्याचबरोबर धान्याला कीड लागू नये म्हणून तुम्ही त्यात कडुलिंबाचा पाला देखील ठेऊ शकता. किंवा आपल्या घरात सहज उपलब्ध असणारी लवंग, तमालपत्र हे पदार्थ गव्हाच्या आणि तांदळाच्या पिठात ठेवल्याने पीठ दीर्घकाळ चांगले राहते. त्यामुळे स्वाद देखील चांगला येतो.

हे ही वाचा:

Brijbhushan Singh यांच्यावर कारवाई होत नसल्याने कुस्तीपटूंनी केले मेडल्स विसर्जित

यंदाच्या IPL 2023 मधील खेळाडूंवर पैशांची उधळण

मुख्यमंत्री Eknaath Shinde ८ वाजता महत्वाची पत्रकार परिषद घेणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss