Saturday, April 27, 2024

Latest Posts

लाखो शिवभक्त Shivrajyabhishek दिनानिमित्त रायगडावर

आज तारखेनुसार अखंड हिंदुस्तानच्या दैवताचा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) शिवराज्यभिषेक सोहळा साजरा होत आहे.

आज तारखेनुसार अखंड हिंदुस्तानच्या दैवताचा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) शिवराज्यभिषेक सोहळा साजरा होत आहे. महाराजांचा हा ३५० वा शिवराज्यभिषेक सोहळा साजरा होत असून लाखोंच्या संख्येने शिवभक्त राज्याच्या अनेक भागातून या सोहळ्यासाठी रायगडावर येत आहेत. इतिहासात किल्ले रायगडावर न भूतो न भविष्यति असा झालेला ‘शिवराज्याभिषेक सोहळा’ पार पडला. या वर्षी २ जून तिथी नुसार तसेच ६ जून रोजी तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३४९ वर्ष पूर्ण झाली आहेत. व ३५० व वर्ष सुरु होत आहे.

६ जून हा दिवस म्हणजे स्वराज्याच्या ध्येयासाठी सुरू झालेल्या लढ्यातला मोठा दिवस. आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ म्हणजेच ६ जून १६७४ रोजी राजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला आणि रयतेचे लाडके महाराज छत्रपती झाले. हिंदुस्थानच्या इतिहासातला हा फार मोठा दिवस आहे. या दिवसानिमित्त स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

स्वराज्य स्थापन करणे हे ‘मराठ्यांचे बंड’ नसून सार्वभौम राज्याची स्थापना आहे हे या शिवराज्याभिषेकामुळे दिसून आलं. राज्याभिषेक सोहळ्याचा हा दिवस म्हणजे स्वराज्याची सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. राज्याभिषेकावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. महाराजांनी स्वतंत्र राज्याची ‘राज्याभिषेक शक’ ही नवीन कालगणना सुरू केली. तसेच आर्थिक व्यवहारासाठी शिवराई आणि होन अशी मोडी (मराठी) लिपीतील नाणी चलनात आणली.

महाराष्ट्रातील अनेक लढवहीया, जीवालाजीव देणाऱ्या मराठी मावळ्यांच्या साथीने महाराजांनी परकीय सत्ताधिशांविरुद्ध स्वतंत्र लढा सुरु केला. यामुळे गुलामगिरीत पिचलेल्या महाराष्ट्रातील जनतेची मनातील आग स्वराज्याच्या प्रेरणेनं ज्वलंत झाली. स्वराज्य स्थापन करताना छत्रपती शिवरायांना आदिलशाही, मुघलांशी लढा देताना स्वकीयांचाही सामना करावा लागला. विविध जाती-धर्मातील लोकांना एकत्र करत छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य उभारले.

हे ही वाचा:

Monsoon पूर्वी चक्रीवादळ होणार दाखल? ‘Biparjoy’ चक्रीवादळाचा धोका

आजचे राशिभविष्य, ०६ जून २०२३, आरोग्यासाठी उत्तम …

बडीशेपचे हे आहेत फायदे; केसगळतीवर देखील फायदेशीर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss