Saturday, June 3, 2023

Latest Posts

समीर वानखेडेंनी सादर केले शाहरुख सोबतचे संभाषण, “माझ्या मुलाची काळजी घे”

२ ऑक्टोबर २०२१ रोजी गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझ वर एनसीबीने टाकलेल्या छाप्यात पाच ग्रॅम मेफ्रेडॉन, १३ ग्रॅम कोकेन, २१ ग्रॅम चरस, एमडीएमएच्या २२ गोळ्या जमा करण्यात आल्या होत्या. सोबत १ लाख ३३ हजारांची रोकड ही जप्त करण्यात आली होती.

२ ऑक्टोबर २०२१ रोजी गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझ वर एनसीबीने टाकलेल्या छाप्यात पाच ग्रॅम मेफ्रेडॉन, १३ ग्रॅम कोकेन, २१ ग्रॅम चरस, एमडीएमएच्या २२ गोळ्या जमा करण्यात आल्या होत्या. सोबत १ लाख ३३ हजारांची रोकड ही जप्त करण्यात आली होती. यावेळीच एनसीबीने क्रूझ वर असलेल्या आर्यन खानसह (Aryan Khan) ८ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. तसेच त्यांच्यावर अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. याच केसच्या संदर्भात समीर वानखेडेंनी लाज घेतल्याचे पुरावे सीबीआयच्या हाती लागल्याने समीर वनखडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे.

याच संधर्भात समीर वानखेडेंनी हाय कोर्टात रिट याचिका दाखल केली आहे. यात समीर वानखेडेंनी आर्यन खान तुरुंगात असताना शाहरुख खान आणि माझ्या मध्ये अनेकदा संभाषण झाल्याचे सांगितले आहे. तसेच माझ्या वरचे सर्व आरोप हे चुकीचे आहे, असे सुद्धा या रिट याचिकेत सांगण्यात आले आहे. या याचिकेद्वारे समीर वानखेडेंनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

समीर वानखेडेंच्या रिट याचिकेतील समीर वानखेडें आणि शाहरुख खानच्या संभाषणातून एका बापाची त्याच्या मुलां संबंधी असलेली काळजी दिसून येते. या संभाषणात शाहरुख खान सतत, ‘माझ्या मुलाची काळजी’ घे असे समीर वानखेडेंना म्हणत आहे. तर वानखेडे यांनी दिलेल्या उत्तराने ते आपलं कर्तव्य बजावत असल्याचं दिसून येत आहे. या संभाषणात शाहरुख खान सतत आपल्या मुलाची म्हणजेच आर्यन खान ची चांगली बाजू समीर वानखेडेंना सांगत आहे. समीर वानखेडेंनी रिट याचिकेत सादर केलेले हे संभाषण ३ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० वाजून ३७ मिनिटांनी घडलेले आहे.

हे ही वाचा : 

काजू खाताय ? मग ही बातमी नक्की वाचा तुमच्या आरोग्य वर होऊ शकतो मोठा परिणाम!

Cannes Film Festival मध्ये Urvashi Rautela चा हटके मेकओवर, ‘या’ अभिनेत्रीची कॉपी केल्याची नेटकऱ्यांची टीका

ये रे ये रे पावसा…!, पुढील २४ तासात अंदमानात पावसाचे होणार आगमन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss