Saturday, April 27, 2024

Latest Posts

‘या’ तारखेला जाहीर होणार HSC निकाल, जाणून घ्या कसा बघता येईल निकाल

सध्या संपूर्ण राज्यातील जनतेचं लक्ष जसे राज्यातील राजकारणाकडे लागले आहे तसेच राज्यातील दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) विध्यार्थ्यांच्या निकालाकडे देखील लागले आहे.

सध्या संपूर्ण राज्यातील जनतेचं लक्ष जसे राज्यातील राजकारणाकडे लागले आहे तसेच राज्यातील दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) विध्यार्थ्यांच्या निकालाकडे देखील लागले आहे. नुकताच सीबीएससी (CBSC) आणि आयसीएससी (ICSC) बोर्डाचा बारावीचा निकाल नुकताच लागला. तसेच इतर राज्यातील देखील मोठ्या राज्याचे निकाल देखील लागले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या निकालाकडे आता सर्वांचे लक्ष हे लागले आहे.

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा इयत्ता १२ चा निकाल हा आता लवकरच लागणार आहे. या निकालाची विद्यार्थ्यांसह पालकांना देखील या निकालाची उत्सुकता ही लागली आहे. बारावी नंतर पुढे काय कार्यच या संदर्भात अनेक प्रश्न हे पडले आहेत. परंतु जेव्हा निकाल लागले तेव्हाच विद्यार्थ्यांना योग्य मार्ग हा निवडता येऊ शकतो. बारावीनंतरच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हा निकाल अत्यंत महत्त्वाचा असतो. अर्थात बारावीच्या परीक्षा या फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या आहेत. दरवर्षी बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल हा मे महिन्याच्या अखेरीस लागतो. त्यामुळे यंदा निकाल हा कधी लागणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे. सायन्स, कॉमर्स, आर्ट तिन्ही विभागांचा निकाल महाराष्ट्र स्टेट बोर्टच्या अधिकृत वेबसाईटवर mahresult.nic.in पाहता येईल.यासोबतच विद्यार्थ्यांना SMS द्वारेही निकाल पाहता येणार आहे.

महाराष्ट्र स्टेट बोर्ड २५ मे पर्यंत निकालाची तारीख जाहीर करणार आहे. त्यांनतर लगेचच २७ तारखेपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. तर इयत्ता १० चा निकालही जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागणार आहे. तसेच SMS द्वारे निकाल मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मेसेज बॉक्समध्ये जावून आपला सीट नंबर टाकून 57766 या क्रमांकावर सेंड करावा लागणार आहे. यानंतर त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल. महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या अधिकृत संकेतस्थळावर (mahresult.nic.in) जावून HSC result 2023 या लिंक वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा सीट नंबर आणि जन्म तारीख टाकून तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता. यानंतर त्या PDF ची प्रिंटआऊट काढून घ्या.

कुठे पाहाल निकाल?

पुढील वेबसाइटवर पाहता येईल निकाल –

https://hscresult.mkcl.org/

https://hsc.mahresults.org.in

www.mahresult.nic.in

हे ही वाचा:

‘Anupamaa’ फेम Nitesh Pandey यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, एकाच इंडस्ट्रीला तिसरा धक्का

Brothers Day निम्मित पोस्ट चर्चेत; उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो पाहून Raj Thackeray भावुक, छान दिवस होते…

IPL 2023, चेन्नईचा संघ अंतिम सामन्यात तर गुजरात खेळणार क्वालिफायर २ चा सामना

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss