Friday, April 26, 2024

Latest Posts

अत्याचाराच्या सर्वाधिक तक्रारी ठाणे जिल्यातून

मागील बऱ्याच दिवसांपासून राज्यामध्ये महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. अशातच राज्यमधिल सर्वाधिक महिला अत्याचाराच्या तक्रारी या ठाणे (Thane) जिल्यामधून घडत आहेत अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिली आहे.

मागील बऱ्याच दिवसांपासून राज्यामध्ये महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. अशातच राज्यमधिल सर्वाधिक महिला अत्याचाराच्या तक्रारी या ठाणे (Thane) जिल्यामधून घडत आहेत अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिली आहे. ठाणे जिल्या हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा असल्यामुळे ही माहिती आणखी हायलाइट होत आहे. या सर्व माहिती महिला आयोगाकडून देण्यात आली आहे आणि त्याने ठाणे जिल्याचा आढावा देखील घेतला आहे. यावेळी त्यांनी जनसुनावणी देखील आयोजित करण्यात आली होती.

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राज्य महिला आयोगाच्या ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रम अंतर्गत मंगळवारी जनसुनावणी पार पडली. त्यामध्ये एकूण १७४ महिलांनी आपल्या तक्रारी नोंदवल्या आहेत आणि ठाण्यामधून आलेल्या तक्रारी राज्यामधील सर्वाधिक तक्रारी आहेत असे रुपाली चाकणकर म्हणाल्या. ही सुनावणी जिल्हाधिकारी कार्यालयामधील नियोजनामध्ये भवनात ही सुनावणी पार पडली. या कार्यक्रमामध्ये यावेळी समुपदेशक, पोलीस, विधी अधिकारी यांचा सहभाग असलेले २ पॅनल तयार केले आहेत आणि एकाच वेळी १७४ तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली.

सुनावणी झाल्यानंतर रुपाली चाकणकर माध्यमांना माहिती देताना म्हणाल्या की, महिला आयोगाच्या वतीने ठाणे शहर आणि ग्रामीण भागाचा आढावा बैठक घेण्यात आली आहे. त्यावेळी सुनावणी आयोजित करण्यात आली होती. या सुनावणीच्या निमित्ताने एकूण १७४ तक्रारदार आपल्या तक्रारी घेऊन आल्या होत्या अशा रुपाली चाकणकर म्हणाल्या. यामध्ये सर्वात जास्त ११६ कौटुंबिक समस्या असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामध्ये सामाजिक समस्या १८, मालमत्ता संबंधित ०९, कामाच्या ठिकाणी होणारे अत्याचार ०५ आणि इतर २६ अशा एकूण १७४ तक्रारी आल्या होत्या. राज्यामध्ये फिरताना आढावा घेणारा हा माझा २४ वा आळा आहे आणि या २४ जिल्यांमध्ये आतापर्यतच्या सर्वात जास्त तक्रारी ठाणे जिल्यामधून आल्या आहेत असे रुपाली चाकणकर म्हणाल्या.

हे ही वाचा:

Manipur मध्ये माजी आमदाराने भडकवली दंगल, तब्बल ५ दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद

जयंत पाटलांना #ED चौकशीत घेऊन कोणाचा कार्यक्रम कोण करतंय? Who is targeting |

ईडीकडून नोटीस मिळाल्यावर शक्तिप्रदर्शन करण्याचा नवीनच पॅटर्न – संजय शिरसाट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss