Friday, June 2, 2023

Latest Posts

IPL2023, फाफ डुप्लेसीचे ऑरेंज कॅपवर एकहाती वर्चस्व

आयपीएल २०२३ (IPL 2023) मध्ये पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅपसाठी खेळाडूंमध्ये चांगलीच लढत सुरु आहे. आयपीएलच्या सोळाव्या सीझनमध्ये आतापर्यत ५५ सामने झाले आहेत.

आयपीएल २०२३ (IPL 2023) मध्ये पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅपसाठी खेळाडूंमध्ये चांगलीच लढत सुरु आहे. आयपीएलच्या सोळाव्या सीझनमध्ये आतापर्यत ५५ सामने झाले आहेत. आयपीएलच्या या सीझनमध्ये अनेक खेळाडूंनी आपल्या उत्तम कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसी याने ऑरेंज कॅपवर एकहाती वर्चस्व मिळवले आहे. पर्पल कॅप कोणाकडे जाणार यामध्ये स्पर्धा सुरु आहे. या शर्यतीत तुषार देशपांडे, शमी, राशीद यासह इतर गोलंदाजांमध्ये टक्कर सुरु आहे. आयपीएल च्या १६ व्या सीझनमध्ये पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅपची लढाई अतिशय रंगतदार सुरु आहे.

ऑरेंज कॅप ही फलंदाजांना दिली जाते या शर्यतीत फाफ डुप्लेसी हा अव्वल स्थानावर आहे. फाफ डुप्लेसीने आतापर्यत ११ सामन्यांमध्ये 576 धावा केल्या आहेत. या आयपीएलच्या सीझनमध्ये 500 धावांचा पल्ला पार करणारा फाफ डुप्लेसी हा एकमेव फलंदाज आहे. या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राजस्थानचा यशस्वी जयस्वाल आहे. यशस्वी ने आतापर्यत ४७७ धावा केल्या आहेत. गुजरात टायटन्सचा खेळाडू शुभमन गिल, चेन्नई सुपर किंग्सचा डेवेन कॉनवे आणि विराट कोहली यांचा समावेश आहे. आयपीएलच्या अखेरीस ऑरेंज कॅप कोण जिंकणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आयपीएलमध्ये पर्पल कॅपच्या लढतीत अव्वल स्थानावर मोहम्मद शमीकडे पर्पल कॅप आहे. शमीने या सीझनमध्ये १९ विकेट्स घेतले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या राशीद खान यानेही १९ विकेट घेतल्या आहेत. आघाडीच्या पाच गोलंदाजात तुषार देशपांडे याचाही समावेश आहे. तुषार देशपांडे याच्या नावावरही १९ विकेट आहेत..पीयुष चावला १७ विकेटसह चौथ्या क्रमांकावर आहे तर वरुण चक्रवर्तीही १७ विकेटसह पाचव्या क्रमांकावर आहे.

हे ही वाचा : 

सर्वात मोठी बातमी !, सत्तासंघर्षांचा निकाल काही तासांवर असताना Narhari Zirwal ‘नॉट रिचेबल’

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष Jayant Patil यांना ईडीची नोटीस

Maharashtra Political Crisis, आज ‘महाराष्ट्राचा सर्वोच्च निकाल’, १६ आमदारांच्या अपात्रतेचा होणार फैसला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss