Sunday, June 4, 2023

Latest Posts

IPL2023, आयपीएल २०२३ मधील गुणतालिकेचा खेळ, जाणून घ्या

आयपीएल २०२३ चा शेवटचा टप्पा आहे आणि हा सिझन तेवढाच रोमांचक होत चालला आहे. आयपीएलमधील १० संघानी या स्पर्धेमध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी क्रिकेटच्या मैदानावर चांगलाच संघर्ष केला.

आयपीएल २०२३ चा शेवटचा टप्पा आहे आणि हा सिझन तेवढाच रोमांचक होत चालला आहे. आयपीएलमधील १० संघानी या स्पर्धेमध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी क्रिकेटच्या मैदानावर चांगलाच संघर्ष केला. जसजसे स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये जात आहे तसतसा खेळाडूंचा आणि चाहत्यांचा उत्साह हा शिगेला पोहचत आहे. आयपीएल २०२३ च्या गुणतालिकेची खबर ठेवणे चाहत्यांसाठी आणि उत्साहासाठी महत्वपूर्ण बनते. क्रिकेट चाहत्यांना त्यांच्या पसंतीचे आवडते संघ असतात आणि ते नेहमीच त्यांच्या संघाला सपोर्ट करत असतात. आपल्या आवडत्या संघाची कामगिरी, विजय, पराभव आणि निव्वळ धावगती या सर्व गोष्टींकडे चाहत्यांचे लक्ष नेहमीच लागलेले असते. १५ मे रोजी झालेला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या दोन संघांमध्ये हा सामना पार पडला आणि या सामन्यांमध्ये गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादवर ३४ धावांनी विजय मिळवला.

गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानावर १८ गुंणासह गुजरात टायटन्सचा संघ विराजमान आहे गुजरातच्या संघाने १३ सामने खेळले आहेत त्यापैकी ९ सामन्यांमध्ये त्यांना विजय मिळवता आला आहे आणि ४ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर त्यांच्या मागोमाग दुसऱ्या क्रमांकावर एमएस धोनीच्या नेतृत्वात १५ गुणांसह चेन्नई सुपर किंग्सचा संघ आहे. चेन्नईच्या संघाने आतापर्यत १३ सामने खेळले आहेत त्यापैकी ५ सामन्यांमध्ये त्यांना विजय मिळवता आला आहेत तर ५ सामन्यांमध्ये ते पराभव झाले आहेत. कालचा सामान जिंकून लखनौ सुपर जायंटन्सचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे तर ६३ व्या सामन्यांमध्ये पराभव झालेल्या मुंबई इंडियन्सचा संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत चौथ्या क्रमांकावर कायम आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगरुळुचा संघ आता पर्यत १२ सामने झाले आहेत त्यापैकी ६ सामान्यांमध्ये त्यांना विजय मिळवता आला आहे तर ६ सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे १२ गुणांसह आरसीबीचा पाचव्या क्रमांकावर आहे.

गुणतालिकेमध्ये राजस्थान रॉयल्सचा संघ १२ गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. राजस्थानच्या संघाचे आतापर्यत १३ सामने झाले आहेत त्यापैकी ६ सामन्यांमध्ये त्यांचा विजय झाला आहे आणि ७ सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. कोलकाता नाइट रायडर्सच्या संघाने आतापर्यत १३सामने खेळले आहेत त्यापैकी त्यांना ६ सामन्यांमध्ये विजय मिळाला आहे आणि ७ सामन्यांमध्ये त्याचा पराभव झाला आहे. गुणतालिकेमध्ये तळाशी म्हणजेच शेवटच्या स्थानावर ८ गुणांसह दिल्ली कॅपिटल्सचा संघ आहे दिल्लीचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. त्याचबरोबर सनरायझर्स हैदराबाद संघ ८ गुणांसह नवव्या क्रमांकावर आहे तर १२ गुणांसह पंजाब किंग्सचा संघ आठव्या क्रमांकावर आहे. आयपीएल २०२३ मध्ये कोणते संघ प्लेऑफ मध्ये जाणार याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा : 

मंत्रिपदाचं आमिष दाखवून आमदारांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न उघडकीस

त्र्यंबकेश्वरमधील घटनेवर संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया, काहीही चुकीचं घडलेलं नाही…

पी एमच्या खुर्चीवर नामोंची ९ वर्षे;सत्ता नसलेल्या राज्यात आता भाजपचा हैट्रिक प्लॅन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss