Saturday, April 27, 2024

Latest Posts

MI vs LSG, जाणून घ्या एलिमिनेटर सामन्याची प्लेइंग ११, मुंबई विरुद्ध लखनौ

आज आयपीएल २०२३ (IPL 2023) च्या प्लेऑफच्या शर्यतीला सुरुवात झाली आहे. काल क्वालिफायर १ (Qualifier 1) चा सामना पार पडला आणि त्या सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) दमदार कामगिरी करून अंतिम फेरीत विजय मिळवला आहे.

आज आयपीएल २०२३ (IPL 2023) च्या प्लेऑफच्या शर्यतीला सुरुवात झाली आहे. काल क्वालिफायर १ (Qualifier 1) चा सामना पार पडला आणि त्या सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) दमदार कामगिरी करून अंतिम फेरीत विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने शेवटच्या सामन्यामध्ये सनरायझर्स हैदराबादला (Sunrisers Hyderabad) पराभूत करून इंडियन प्रीमियर लीग २०२३ च्या प्लेऑफमध्ये (playoffs) जागा मिळवली आहे. आजचा एलिमिनेटर (Eliminator) सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (Mumbai Indians vs Lucknow Super Giants) या दोन संघांमध्ये रंगणार आहे. आजचा हा सामना चेन्नईमधील चेपॉक स्टेडियमवर संध्याकाळी ७.३० वाजता खेळवला जाणार आहे.

मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ आयपीएल मध्ये ३ वेळा आमनेसामने आले आहेत आणि तिन्ही वेळा लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला पराभव केले आहे. पाचवेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकणारा मुंबई इंडियन्सचा संघ त्यांच्या संधींबद्दल बऱ्यापैकी आत्मविश्वास बाळगतील कारण मुंबईचे फलंदाज सध्या चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. मुंबई इंडियन्सच्या कॅमेरून ग्रीनने यामागील सामन्यांमध्ये शतक ठोकले होते आणि कर्णधार रोहित शर्माने सुद्धा त्याची बॅट चालवली. लखनौ सुपर जायंट्सचा सलामीवीर क्विंटन डी कॉक चांगली सुरुवात करण्यात यशस्वी झाला आहे तर मार्कस स्टॉइनिस आणि निकोलस पूरन यांनी सनसनाटी कामगिरी करत आहेत. आज कोणता संघ क्वालिफायर २ खेळेल आणि कोणता संघ ट्रॉफीच्या शर्यतीतून बाहेर होईल याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले.

लखनौ सुपर जायंट्सची संभाव्य प्लेइंग ११ –
क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), काइल मेयर्स, कृणाल पंड्या (क), प्रेराक मंकड, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, अमित मिश्रा, यश ठाकूर, रवी बिश्नोई, मोहसीन खान, आवेश खान

मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेइंग ११ –
रोहित शर्मा (क), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, कुमार कार्तिकेय, ख्रिस जॉर्डन, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल

हे ही वाचा:

Manipur मध्ये माजी आमदाराने भडकवली दंगल, तब्बल ५ दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद

जयंत पाटलांना #ED चौकशीत घेऊन कोणाचा कार्यक्रम कोण करतंय? Who is targeting |

ईडीकडून नोटीस मिळाल्यावर शक्तिप्रदर्शन करण्याचा नवीनच पॅटर्न – संजय शिरसाट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss