Friday, April 26, 2024

Latest Posts

Neeraj Chopra ने रचला जागतिक स्तरावर इतिहास

भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने (Golden Boy Neeraj Chopra) जागतिक ऍथलेटिक्सने जाहीर केलेल्या भालाफेक क्रमवारीमध्ये पहिले स्थान मिळवले आहे.

भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने (Golden Boy Neeraj Chopra) जागतिक ऍथलेटिक्सने जाहीर केलेल्या भालाफेक क्रमवारीमध्ये पहिले स्थान मिळवले आहे. नीरज चोप्रा १४५५ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. त्यामुळे भारताचा पुन्हा एकदा जागतिक स्तरावर तुरा उंचावला आहे. २२ मे रोजी निरजने ही कामगिरी केली. या आधी विश्वविजेता अँडरसन पीटर्स १४३३ गुणांसह नीरजपेक्षा २२ गुणांनी पुढे होता. अँडरसन पीटर्स (Anderson Peters) याला मागे टाकून नीरज चोप्राने पहिले स्थान मिळवले आहे. मागील वर्षांमध्ये ३० ऑगस्ट रोजी जागतिक क्रमवारीमध्ये दुसऱ्या स्थानावर होता.

जागतिक क्रमवारीमध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारा जाकुब वडलेज (Jakub Wadledge) १४१६ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. जागतिक क्रमवारीमध्ये टॉप च्या रँकिंमध्ये पाकिस्तानचा अर्शद नदीम Arshad Nadeem) १३०६ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. नीरज चोप्राने जागतिक ऍथलेटिक्स क्रमवारीमध्ये अव्वल स्थान मिळवून या भारताच्या गोल्डन बॉयने इतिहास रचला आहे. या क्रमवारीमध्ये चौथ्या क्रमांकावर जर्मनीचा ज्युलियन वेबर (Julian Weber )असून त्याचे सध्या १३८५ गुण आहेत.

पुरुष भालाफेक जागतिक क्रमवारी टॉप – ५ ऍथलेटिक्स

  1. नीरज चोप्रा (भारत) – १४५५ पॉइंट्स
  2. अँडरसन पीटर्स (ग्रॅनडा) – १४३३ पॉइंट्स
  3. जॅकब वडलेज्च (चेक रिपब्लिक) – १४१६ पॉइंट्स
  4. जुलियन वेबर (जर्मनी) – १३८५ पॉइंट्स
  5. अरशद नदीम (पाकिस्तान) – १३०६ पॉइंट्स

हे ही वाचा:

Manipur मध्ये माजी आमदाराने भडकवली दंगल, तब्बल ५ दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद

जयंत पाटलांना #ED चौकशीत घेऊन कोणाचा कार्यक्रम कोण करतंय? Who is targeting |

ईडीकडून नोटीस मिळाल्यावर शक्तिप्रदर्शन करण्याचा नवीनच पॅटर्न – संजय शिरसाट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss