Wednesday, June 7, 2023

Latest Posts

SRHvsGT, गुजरातचा संघ आज प्लेऑफ मध्ये पोहोचणार नाही की अजून वाट पाहावी लागेल

आयपीएल 2023 च्या (IPL 2023) आजच्या सामन्यामध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad) हे संघ आमने-सामने असणार आहेत.

आयपीएल 2023 च्या (IPL 2023) आजच्या सामन्यामध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad) हे संघ आमने-सामने असणार आहेत. मागील झालेले सामन्यांमध्ये गुजरात टायटन्सला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे ते प्लेऑफ मध्ये जाऊ शकले नाही. आजचा सामना हा अहमदाबादमधीलमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडणार आहे. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली संघासाठी आजचा सामना महत्त्वाचा ठरणार आहे. जर आजचा सामना गुजरात टायटन्स संघ विजयी झाला तर आयपीएल २०२३ मधील पोहोचणारा पहिला संघ बनेल.

आजचा सामना गुजरात टायटनसाठी महत्वाचा ठरणार आहे. गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्या गुणतालिकेबद्दल बोलायचं झालं तर गुजरात टायटनचा संघ १६ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. गुजरातच्या संघाने आतापर्यंत १२ झाले आहेत आणि त्यापैकी ८ सामन्यांमध्ये त्यांनी विजय मिळवला आहे आणि ४ सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर सनरायझर्स हैदराबाद बद्दल बोलायचे झाले तर सनरायझर्स हैदराबादचा संघ ८ गुणांसह आठवा स्थानावर आहे. हा संघ प्लेऑफ च्या लढतीतून जवळपास बाहेरच झाला आहे. हा त्यांचे उर्वरित ३ सामने जिंकला तरी ते १४ गुणांसह प्लेऑफ मध्ये जाऊ शकणार नाहीत.

गुजरात टायटन्सची संभाव्य प्लेइंग ११
ऋद्धिमान साहा, शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, नूर अहमद, अल्जारी जोसेफ, मोहित शर्मा, मोहम्मद शमी

सनरायझर्स हैदराबाद संभाव्य प्लेइंग ११
अनमोलप्रीत सिंह, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडम मार्करम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, ग्लेन फिलिप, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, ट नटराजन, मयंक मार्कंडेय, फजलहक फारूकी

हे ही वाचा : 

युनेस्कोला बारसूमध्ये कातळ शिल्प सापडली

राज ठाकरेंनी केली मुंबई -गोवा महामार्गाची समृद्धी महामार्गासोबत तुलना

Raj Thackeray यांचा शरद पवरांवर निशाणा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवार घेत नाहीत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss