Saturday, April 27, 2024

Latest Posts

चांद्रयान ३ जुलैमध्ये प्रक्षेपित करण्यात येणार

चंद्रावर भारताची पहिली मोहीम २२ ऑक्टोबर २००८ रोजी श्रीहरिकोटा येथून यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आली होती. चंद्राच्या रासायनिक, खनिजे आणि फोटो-जिओलॉजिकल मॅपिंगसाठी हे हे चांद्रयान पाठवण्यात आले होते.

चंद्रावर भारताची पहिली मोहीम २२ ऑक्टोबर २००८ रोजी श्रीहरिकोटा येथून यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आली होती. चंद्राच्या रासायनिक, खनिजे आणि फोटो-जिओलॉजिकल मॅपिंगसाठी हे हे चांद्रयान पाठवण्यात आले होते. चंद्राच्या पृष्ठभागापासून किमी उंचावर चंद्राभोवती फिरत होते. या चांद्रयानामध्ये भारत यूएसए, यूके, जर्मनी, स्वीडन आणि बल्गेरियामध्ये तयार केलेली ११ वैज्ञानिक उपकरणे होती.

२० ऑगस्ट २०१९ रोजी चांद्रयान-२ यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत समाविष्ट करण्यात आले. १०० किमी चंद्राच्या ध्रुवीय कक्षेत चंद्राभोवती फिरत होते. चांद्रयान ३ ची तारीख भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने जाहीर केली आहे. चांद्रयान ३ या जुलैमध्ये प्रक्षेपित करण्यात येणार आहे. २९ मे रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने श्रीहरिकोटा येथून आज नवीन युगातील नेव्हिगेशन उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला आहे.

आंध्रप्रदेशमधील श्रीहरिकोटा येथील सतीश शावन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपण करण्यात आले. या उपग्रहाचे नाव NVS-०१ आहे. जो GSLV-F१२ रॉकेटद्वारे लॉन्च पॅड-२ वरून सोडण्यात आला. चांद्रयान ३ या वर्षी जुलैमध्ये प्रक्षेपित केले जाईल. इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी सांगितले की, भारताकडे ७ नेव्हिगेशन उपग्रह आहेत. त्यापैकी केवळ ४ कार्यरत आहेत त्यामधील ३ खराब झाले आहेत. जर आपण तीनही बाळाला तर तोपर्यत ते चारही निरुपयोगी होतील. म्हणूनच आम्ही पाच नेक्स्ट जनरेशन नाविक उपक्रम NVS सोडण्याची तयारी केली आहे.

हे ही वाचा:

IPL २०२३ च्या फायनलला वरुणराजाची उपस्थिती ; वादळी वाऱ्यासह आगमन

IPL 2023 Final, आज रंगणार महामुकाबलाचा थरार… कोण पटकवणार IPL 2023 मान? जाणून घ्या सविस्तर माहिती

दिल्लीच्या जंतरमंतरवर कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये झाला राडा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss