Saturday, June 3, 2023

Latest Posts

Instagram Account Hack झालय? घ्या ‘ही’ खबरदारी आणि रहा हॅकर्स पासून सुरक्षित…

इंस्टाग्राम हे मेटाचे सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. सध्या भारतात इंस्टाग्राम वापरणारा भला मोठा वर्ग आहे. युथसाठी इंस्टाग्राम हे सर्वात महत्वाचे चॅटिंगचे माध्यम आहे.

इंस्टाग्राम हे मेटाचे सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. सध्या भारतात इंस्टाग्राम वापरणारा भला मोठा वर्ग आहे. युथसाठी इंस्टाग्राम हे सर्वात महत्वाचे चॅटिंगचे माध्यम आहे. जगभरात इंस्टाग्रामचे ५०० दशलक्ष युजर्स आहेत. इतके युजर्स असणाऱ्या या प्लॅटफॉर्मवर सतत नवनवीन अपडेट येत असतात. तसेच हॅकर्सपासून सर्व अकाउंट्स सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात. पण तरीही काही अकाउंट हॅक झालेले पाहायला मिळतात.

इंस्टाग्रामच्या वापरामुळे अनेकजण रात्रीत प्रसिद्धीच्या झोतात आले. फोटो आणि रिल्समुळे अनेकांना प्रसिद्धी मिळाली. अशातच सोशल मीडिया खाते हॅक झाल्याच्या अनेक घटनाही समोर येत आहेत. यात इंस्टाग्राम खाते हॅक झाल्याचेही अनेकदा समोर येतात. इंस्टाग्राम युजर्स अनेक वर्षांपासून हॅकिंगचा सामना करत आहेत. जर कधी तुमचे अकाउंट हॅक झाले किंवा तुम्हाला तशी शंका असेल तर नेमके काय केले पाहिजे चला तर मग जाणून घेऊयात.

इंस्टाग्राम अकाउंट सर्वप्रथम रिपोर्ट करा –

इंस्टाग्राम खाते हॅक झाल्यानंतर तुम्हाला अॅक्सेस करता येत नाही, कारण हॅकर्स तात्काळ पासवर्ड बदलतो. असं झाल्यास तुम्ही एका पद्धतीनं रिपोर्ट करु शकता… त्यासाठी खालील सोप्या टेप्स फॉलो कराव्या लागतील..

मित्राला अथवा परिवारातील कोणालाही इंस्टाग्रामच्या प्रोफाईलवर जाण्यास सांगा..
त्यानंतर उजव्या बाजूला हॅमबर्ग आयकॉन दिसेल… त्यावर क्लिक करा..
त्यानंतर रिपोर्ट ऑप्शनवर क्लिक करा…
Report Account ऑप्शन निवडा…
तुम्हाला अनेक पर्याय दिसतील… त्यापैकी तुम्हाला एक पर्याय निवडावा लागेल.
इंस्टाग्राम खात्याचा रिपोर्ट करण्यासाठी तुम्हाला एक कारण द्यावं लागेल…
तुम्ही It’s pretending to be someone else हा पर्यायही निवडू शकता..
त्यानंतर तुम्हाला Someone I Know च्या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
रिपोर्ट मिळाल्यानंतर इंस्टाग्राम प्रोपाईलची तपासणी करेल.

खात्याचं अक्सेस् मिळण्यासाठी पाठवा रिक्वेस्ट –

हॅकर्स इंस्टाग्राम खातं हॅक केल्यानंतर तुमच्या सर्व डिवायसमधून लॉगआऊट करु शकतं. तसेच पासवर्डही बदलू शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही ई-मेलच्या मदतीनं इंस्टाग्रामवर लॉग इन साठी रिक्वेस्ट पाठवू शकता…

Instagram ओपन केल्यानंतर तुम्हाला लॉग इन असे स्क्रीनवर दिसेल.
पासवर्ड बदलल्यानंतर Get help logging in असा पर्याय निवडा…
वरील पर्याय निवडल्यानंतर इन्स्टाग्राम तुमच्या इनबॉक्समध्ये एक विशेष लिंक पाठवेल…
लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांनी दिलेली माहिती फॉलो करा..

सिक्योरिटी कोडद्वारे करा लॉगिन –

वरती दिलेल्या कोणताही पर्याय काम करत नसेल तर सिक्योरिटी कोडद्वारे रिक्वेस्ट करु शकता..
इंस्टाग्राम ओपन करा.. त्यानंतर लॉगइन स्क्रीन आल्यानंतर Get Help Logging In हा पर्याय सिलेक्ट करा.
त्यानंतर तुमचा यूजरनेम, ईमेल अॅड्रेस आणि फोन क्रमांक टाका…
त्यानंतर Need more help? हा पर्याय निवडा आणि स्क्रीनवरील दाखवण्यात आलेले टिप्स फॉलो करा. त्यानंतर Send security code वर क्लिक करा..
त्यानंतर तुमचा ईमेल इनबॉक्स पाहा… त्यावर एक कोड येईल.. तो कोड इन्स्टाग्रामवर टाका…
आता इंस्टाग्राम खातं रिकवर करण्यासाठी तुमची आयडेंटिटी व्हेरिफाय करा…

हे ही वाचा : 

शूटिंगच्या दरम्यान सलमान खानला झाली दुखापत, चाहते चिंतेत

AI च्या माध्यमातून तयार केलेले फोटो होतायत तुफान व्हायरल.

‘द केरला स्टोरी’ च्या निर्मात्यांचं जगाला रोखठोक उत्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss