Friday, April 26, 2024

Latest Posts

Odisha Train Accident – ओडिशामधील भीषण अपघाताच्या वेळी नेमके झाले काय? सांगितले प्रवाशांनी

ओडिशामधील बालासोर जिल्यामध्ये बहानगा रेल्वे स्थानकाजवळ कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेन रुळावरून ट्रेन घसरली आहे. त्यामुळे भीषण अपघात झाला आहे आणि त्यामध्ये २८८ जणांचा मृत्यू झाला आहे.

ओडिशामधील बालासोर जिल्यामध्ये बहानगा रेल्वे स्थानकाजवळ कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेन रुळावरून ट्रेन घसरली आहे. त्यामुळे भीषण अपघात झाला आहे आणि त्यामध्ये २८८ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेसचे चार डबे रुळावरून घसरले आहेत. देशामध्ये १६ महिन्यातून दुसरा सर्वात अपघात झाला आहे. अपघातात सर्वात आधी हावडा एक्सप्रेस मालगाडीला धडकली त्यानंतर मालगाडी कोरोमंडल एक्सप्रेसला धडकली. आता अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु करण्याचे काम रेल्वे बचाव यंत्रणेचे सुरु आहे.

या अपघातामध्ये २८८ जणांचा मृत्यू झाला आहे तर ९०० जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या प्रवाशांना विविध ठिकाणांच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे. एक प्रवाशाने सांगितले की, आम्ही ट्रेन मध्ये बसलो होतो. अचानक डबा वेगाने हळू लागला आणि तो उलटला. अपघातानंतर माझ्या गावामधील अनेक लोक सापडत नाही हा अपघात कसा झाला हे आम्हाला माहितीच नव्हते?ट्रेनच्या तुटलेल्या खिडक्यांमधून आम्ही डब्याच्या बाहेर पडलो. मी तर सर्व आशा सोडल्या होत्या. तुटलेल्या खिडकीमधून म्हणजेच ट्रेनच्या डब्यामधून बाहेर पडलेला यशस्वी प्रवासी त्यातला मी एक आहे. असे सुरक्षित निघालेल्या प्रवाशाने सांगितले.

त्यांनतर पुढे प्रवासी म्हणाला की, आम्हाला प्रथमोपचारसाठी दवाखान्यामध्ये नेण्यात आले. मी धोक्याबाहेर आहे पण मला काही जखमी लोक दिसले आहेत त्यांची प्रकृती अत्यंत वाईट आहे असे ते म्हणाला. भीषण अपघात झाल्यानंतर अनेक गाड्यांचे मार्ग दुसऱ्या रुळावरून वळवण्यात आले आहेत. अपघातात जखमी झालेल्या जखमींना वाचवण्यासाठी आणि रुग्णालयामध्ये नेण्यासाठी रेल्वेचे पथक सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनीही एसआरसी नियंत्रण कक्षात पोहोचून या घटनेचा आढावा घेतला आहे.

हे ही वाचा:

आज रात्रीपासून पश्चिम मार्गावर तब्ब्ल १४ तासांचा Special Block, उद्या घराबाहेर जाणार असाल तर वेळापत्रक घ्या जाणून

Odisha रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर घेतला मोठा निर्णय, Mumbai-Madgaon Vande Bharat Express चा उद्घाटन कार्यक्रम रद्द

Odisha Train Accident, २००४ नंतर जगातील सर्वात मोठा रेल्वे अपघात, २३३ लोकांचा मृत्यू तर…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss