Saturday, June 3, 2023

Latest Posts

जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर प्राणघातक हल्ला

जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयासमोर अज्ञातांकडून शुक्रवारी २.४५ च्या सुमारास त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे.

जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयासमोर अज्ञातांकडून शुक्रवारी २.४५ च्या सुमारास त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. त्यानंतर त्यांना लगेचच जखमी अवस्थेमध्ये उपचारासाठी सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.या हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. किशोर आवारे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयामध्ये कामाच्या निमित्त आले होते. या दरम्यान डबा धरून बसलेल्या अज्ञात शस्त्रधारी माणसांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.

या घटनेनंतर तळेगाव दाभाडे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. आणि तळेगावमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे याना पुण्यामधील महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा यांच्या वतीने डॉ.निर्मलकुमार फडकुले यांच्या स्मृतिदिना निमित्त देण्यात येणार समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. कोरोना साथरोग, कोल्हापूर आणि चिपळूण पूर आदी आपत्कालीन परिस्थितीमध्ये किशोर आवारे यांनी स्वखर्चातून भरीव मदतकार्य केले आहे. या हल्ल्यात किशोर आवारे यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्यावर गोळीबार करून त्यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले होते. ल्लेखोरांनी भर दुपारी गजबजाट असलेल्या परिसरामध्ये हल्ला केल्याने सगळ्यांचीच एकच धावपळ उडाली आहे.

हे ही वाचा : 

सर्वात मोठी बातमी !, सत्तासंघर्षांचा निकाल काही तासांवर असताना Narhari Zirwal ‘नॉट रिचेबल’

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष Jayant Patil यांना ईडीची नोटीस

Maharashtra Political Crisis, आज ‘महाराष्ट्राचा सर्वोच्च निकाल’, १६ आमदारांच्या अपात्रतेचा होणार फैसला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss