Saturday, April 27, 2024

Latest Posts

वाहतूक पोलिसांच्या कॅमेराची तुमच्यावर करडी नजर

एखाद्या रस्त्यावरून चालत असताना काही नियम असतात. तुम्ही स्वत:ला सिव्हिल सोसायटीचा भाग समजत असाल, तर तुम्हाला काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

एखाद्या रस्त्यावरून चालत असताना काही नियम असतात. तुम्ही स्वत:ला सिव्हिल सोसायटीचा भाग समजत असाल, तर तुम्हाला काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. जर तुम्ही मुंबई पुणे आणि दिल्ली यासारख्या मेट्रो शहरांमध्ये राहत असाल तर प्रत्येक रस्त्याच्या दोन्ही बाजूने कॅमेरे बसवलेले आहेत. जर एखाद्या व्यक्तीने ट्रॅफिक सिग्नल तोडून वेगाने पुढे गेला तर ट्राफिक कॅमेरे ऑटोमॅटिक चलन तयार करतात आणि तो व्यक्ती राहत असलेल्या घरच्या पत्त्यावर हे चलन त्याला पाठवून देतात. रस्त्यावरील वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यावर नियमानुसार दंड भरावा लागतो. वाहतूक पोलिसांनी बसवलेल्या ट्रॅफिक कॅमेऱ्याची काम करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. जी व्यक्ती वाहतूक नियमांचे उल्लंघन करेल त्या व्यक्तीची सुटका होणे शक्य नाही.

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास व्यक्तीची नेमकी ओळख पटावी म्हणून रस्त्याच्या दोन्ही बाजूला कॅमेरे बसवलेले आहेत. हे कॅमेरे २ मेगापिक्सल आणि उच्च रिझोल्यूशनचे आहेत. तसेच हे कॅमेरे ६० डिग्रीपर्यंत वळू शकतात आणि आसपासचा परिसर कव्हर करू शकतात. यामुळे तुम्ही जर वाहतूक नियमांचे उल्लंघन केले तर कॅमेऱ्याच्या नजरेतून तुमची सुटका होणे खूप अवघड आहे. या कॅमेराच्या माध्यमातून वाहनांच्या वेगाची माहिती सुद्धा मिळते. वाहतूक पोलिसांचे वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी ट्राफिक कंट्रोल रूममधून ते कॅमेरे ऑपरेट केले जातात. यासाठी एक विशेष डाटा एक्सप्रेस सॉफ्टवेअरचा उपयोग केला जात आहे.

त्याचप्रमाणे कॅमेऱ्याच्या माध्यमातून घेण्यात आलेले छायाचित्र आणि व्हिडिओज पुरावे देखील सुरक्षित ठेवले जात आहेत याचं कारण काही मोठा वाद निर्माण झाला तर या पुराव्याला कोर्टासमोर सादर केले जावे त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून डेटाची पूर्ण काळजी घेतली जाते. तुम्ही वाहतूक नियमांचे उल्लंघन केले तर तुम्हाला इ-चलन पाठवेल जाणार आहे. परंतु यासाठी सर्वप्रथम दोन टप्प्यांच्या प्रक्रियेतून जावे लागते. यामध्ये सर्वप्रथम वाहतूक पोलीस स्वयंचलित पद्धतीने माहितीची खात्री केली जाते यामुळे तुम्ही खरंच वाहतूक नियमांचा उल्लंघन केले आहे की नाही याची माहिती होते. या सर्व प्रक्रियेतून गेल्यानंतर मॅन्युअली पद्धतीने तपासले जाते त्यामुळे या कॅमेरेच्या अचूकतेबद्दल कोणतीही शंका घेतली जाऊ शकत नाही.

हे ही वाचा : 

युनेस्कोला बारसूमध्ये कातळ शिल्प सापडली

राज ठाकरेंनी केली मुंबई -गोवा महामार्गाची समृद्धी महामार्गासोबत तुलना

Raj Thackeray यांचा शरद पवरांवर निशाणा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवार घेत नाहीत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss