Tuesday, June 6, 2023

Latest Posts

इंडियन प्रीमियर लीगमध्ये चहलच्या नावी नवा विक्रम

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals) या सामन्यामध्ये राजस्थानचा फिरकी पटू युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) एक मोठा नवा विक्रम रचला आहे.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals) या सामन्यामध्ये राजस्थानचा फिरकी पटू युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) एक मोठा नवा विक्रम रचला आहे. कालच्या सामन्यामध्ये युझवेंद्र चहलने कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणाला २२ धावांवर बाद केले. त्यांनतर व्यंकटेश अय्यर आणि नितीश राणा यांनी ४८ धावांनी महत्वपूर्ण भागीदारी करत कोलकाताचा डाव सावरला होता. या दोघांना बाद करून युझवेंद्र चहलने आपले नाव इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासाच्या सवर्णाक्षरांनी कोरले. शिमरॉन हेटमायरने (Shimron Hetmyer) अफलातून झेल पकडत युझवेंद्र चहलला आपली ऐतिहासिक १८४ वी विकेट घेण्यास मदत केली.

या आधी हा विक्रम चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) स्टार माजी गोलंदाज ड्वेन ब्राव्होच्या (Dwayne Bravo) नावावर होता. ड्वेन ब्राव्होने १८३ विकेट्स घेतल्या आहेत. आता ब्रावो दुसऱ्या क्रमांकावर आहे तर या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर मुंबई इंडियन्सकडून खेळणारा पियुष चावला (Piyush Chawla) १७४ विकेट्स घेतले आहेत. अमित मिश्राने (Amit Mishra) १७२ विकेट्स घेत चौथ्या क्रमांकावर आहे. पाचव्या क्रमांकावर रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आहे याने १७१ विकेट्स घेतले आहेत. हे तीनही खेळाडू अजूनही आयपीएल खेळत असल्यामुळे चहलला चांगलीच स्पर्धा करावी लागणार आहे. कालच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर ट्रेंट बोल्टने पॉवर प्लेमध्ये कोलकाताच्या २ गडी बाद केले. त्यामुळे कोलकाताच्या सुरुवातच संथ झाली.

हे ही वाचा : 

सर्वात मोठी बातमी !, सत्तासंघर्षांचा निकाल काही तासांवर असताना Narhari Zirwal ‘नॉट रिचेबल’

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष Jayant Patil यांना ईडीची नोटीस

Maharashtra Political Crisis, आज ‘महाराष्ट्राचा सर्वोच्च निकाल’, १६ आमदारांच्या अपात्रतेचा होणार फैसला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss