Friday, April 26, 2024

Latest Posts

कोणाच आरक्षण कमी करून काँग्रेस आरक्षण देणार, अमित शाहचे ओपन चॅलेंज

कर्नाटकमध्ये विधासभेच्या निवडणुकीसाठी (Assembly elections Karnataka) येत्या १० मे रोजी मतदान होणार आहे.

कर्नाटकमध्ये विधासभेच्या निवडणुकीसाठी (Assembly elections Karnataka) येत्या १० मे रोजी मतदान होणार आहे. या मतदानाची १३ तारखेला मतमोजणी करण्यात येणार आहेत. यावेळी राजकीय जाणकारांनी असे सांगितले आहे की, भाजपला निवडणूक जड जाणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मुस्लिम आरक्षणाचा पत्ता टाकला आहे. आमच्याच सरकारने मुस्लिमांचे आरक्षण रद्द केले होते. काँग्रेसचे (Congress) जर मुस्लिमांना ६ टक्के आरक्षण देणार असेल तर ते कास देणार हे त्यांनी स्पष्ट केले आहे.

प्रचार संपण्याच्या आधी काँग्रेसने भूमिका स्पष्ट करावी असं ओपन चॅलेंज अमित शाह यांनी दिले आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. परंतु कोणाचं कमी करून ते आरक्षण मुस्लिमाना देणार हे त्यांनी स्पष्ट केलं नाही. ओबीसींच (OBC) आरक्षण कमी करणार की, लिंगायत (Lingayat) समाजाचं? प्रचार संपण्याच्या आधी काँग्रेसने हे स्पष्ट करावे असे आव्हान अमित शाह यांनी दिले नाही.

मुस्लिमाना दिलेले ४ टक्के आरक्षण आमच्या सरकारने संपवले. कारण ते असंवैधानिक होते. आपल्या संविधानामध्ये धर्माच्या आधारावर आरक्षणाची तरतूद नाही असे अमित शाह म्हणाले. काँग्रेसने तुष्टीकरणाची खेळी करून मुस्लिमाना आरक्षण दिले होते परंतु आम्ही ते काढून टाकले. कर्नाटकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता तुफान आहे. त्यामुळे भाजपच्या बहुमताने सत्त्वर येणार असल्याचा विश्वास अमित शाह यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीतून व्यक्त केला.

हे ही वाचा : 

युनेस्कोला बारसूमध्ये कातळ शिल्प सापडली

राज ठाकरेंनी केली मुंबई -गोवा महामार्गाची समृद्धी महामार्गासोबत तुलना

Raj Thackeray यांचा शरद पवरांवर निशाणा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवार घेत नाहीत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss