Saturday, April 27, 2024

Latest Posts

जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये भारताचे लक्ष सुवर्णपदकाचे

जागतिक बॉक्सिंग स्पर्धा (World Boxing Championships) सुरु झाली आहे आणि भारतीय बॉक्सर्सना या स्पर्धेमध्ये इतिहास रचण्याची संधी असणार आहे.

जागतिक बॉक्सिंग स्पर्धा (World Boxing Championships) सुरु झाली आहे आणि भारतीय बॉक्सर्सना या स्पर्धेमध्ये इतिहास रचण्याची संधी असणार आहे. या स्पर्धेमध्ये भारताचे तीन बॉक्सर उपांत्य फेरीत पोहोचले आहेत आणि त्यांनी पदक पक्के केले आहेत. परंतु या तीनही खेळाडूंची प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकल्यास भारतासाठी ही देदीप्यमान कामगिरी ठरणार आहे.या आधी जागतिक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये भारताला सुवर्णपदक पटकावता आलेले नाही. दीपक भोरिया (Deepak Bhoria), मोहम्मद हुसामुद्दीन (Mohammad Husamuddin) व निशांत देव (Nishant Dev) हे तीन भारतीय खेळाडू उद्या उपांत्य फेरीची लढत लढणार आहे.

भारताच्या बॉक्सर्सला उपांत्य फेरीचा अडथळा ओलांडता येणार आहे की ब्राँझपदकावर समाधान मानावे लागते याचे उत्तर उद्याच मिळेल. दीपक भोरियाचा ५१ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीच्या लढतीत फ्रान्सच्या बिल्लाल बेन्नामा याच्याशी दोन हात करायचे आहेत. बेन्नामा याने दोन वेळा जागतिक स्पर्धेत ब्राँझपदक पटकावले आहे. दीपकसमोर खडतर आव्हान असणार आहे. तीन लढतींमध्ये दिपकने सहज विजय साकारला आहे. हुसामुद्दीन हा पहिल्यांदाच जागतिक स्पर्धेमध्ये सहभागी झाला आहे. पहिल्यादाच जागतिक स्पर्धेमध्ये भाग घेऊन सुद्धा त्याने आपली छाप सोसली आहे. निशांत याने ७१ किलो वजनी गटात उपांत्य फेरी गाठली आहे. मागील जागतिक स्पर्धेमध्ये त्याला उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा ओलांडता आला नाही.

हे ही वाचा : 

सर्वात मोठी बातमी !, सत्तासंघर्षांचा निकाल काही तासांवर असताना Narhari Zirwal ‘नॉट रिचेबल’

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष Jayant Patil यांना ईडीची नोटीस

Maharashtra Political Crisis, आज ‘महाराष्ट्राचा सर्वोच्च निकाल’, १६ आमदारांच्या अपात्रतेचा होणार फैसला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss