Tuesday, June 6, 2023

Latest Posts

KKRvsRR, नितीश राणा आणि संजू सॅमसन आमनेसामने

कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. आज ईडन गार्डन्स मैदानावर सामना रंगणार आहे.

कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. आज ईडन गार्डन्स मैदानावर सामना रंगणार आहे. हा सामना युजवेंद्र चहलसाठी (Yuzvendra Chahal) महत्वाचा ठरणार आहे. आजच्या सामन्यामध्ये एक विकेट घेतली तर चहलच्या नावावर मोठा विक्रम होणार आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजामध्ये चहल संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर आहे. चहल आणि ब्राव्हो यांच्या नावावर १८३ विकेट आहेत. चहल याने आज एक विकेट घेतली तर तो पहिल्या क्रमांकावर पोहोचणार आहे.

सध्या गुणतालिकेमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा संघ सहाव्या क्रमांकावर आहे तर राजस्थान रॉयल्सचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे. कोलकाता नाइट रायडर्सचे ११ सामने झाले आहेत त्यापैकी ५ सामन्यांमध्ये त्याना विजय मिळाला आहे. राजस्थान रॉयल्सच्या संघाचे ११ सामने झाले आहेत त्यापैकी त्यांनी ६ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. प्ले- ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी आजची लढत अत्यंत महत्त्वाची असणार आहे. कोलकता नाईट रायडर्सचा संघ सलग तिसऱ्या विजयासाठी प्रयत्न करेल. राजस्थान रॉयल्सचा संघ सलग तीन सामन्यांमध्ये झालेल्या पराभवांची मालिका खंडित करण्यासाठी सज्ज असेल.

कोलकाता नाइट रायडर्सची संभाव्य प्लेइंग ११
जेसन रॉय , रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, शार्दुल ठाकूर, सुनील नरेन, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, सुयश शर्मा

राजस्थान रॉयल्सची संभाव्य प्लेइंग ११
यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकीपर), जो रूट, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट , शर्मा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव

हे ही वाचा : 

सर्वात मोठी बातमी !, सत्तासंघर्षांचा निकाल काही तासांवर असताना Narhari Zirwal ‘नॉट रिचेबल’

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष Jayant Patil यांना ईडीची नोटीस

Maharashtra Political Crisis, आज ‘महाराष्ट्राचा सर्वोच्च निकाल’, १६ आमदारांच्या अपात्रतेचा होणार फैसला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss