Saturday, April 27, 2024

Latest Posts

आतापर्यतच्या IPL फायनल्समधील संघ कोणते?

आयपीएल हे भारतामधील असे क्रिकेटचे लीग आहे जे भारतामध्ये सर्वात जास्त पहिले जाते आणि जनतेचे मनोरंजन देखील करत असते. आज आयपीएल २०२३ चा अंतिम सामना रंगणार आहे.

आयपीएल हे भारतामधील असे क्रिकेटचे लीग आहे जे भारतामध्ये सर्वात जास्त पहिले जाते आणि जनतेचे मनोरंजन देखील करत असते. आज आयपीएल २०२३ चा अंतिम सामना रंगणार आहे. आतापर्यत इंडियन प्रीमियर लीगचे १५ सिझन झाले आहेत. त्यामध्ये मुंबई इंडियन्सने पाच तर चेन्नई सुपर किंग्सने चार वेळा विजय मिळवला आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोण कोण विजेता झाला आहे या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती आहे का?

इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात पहिल्यादा आयपीएलचा सामनावीर युसूफ पठाण याने पटकावला आहे. आयपीएलच्या पहिला सिझन २००८ मध्ये राजस्थान आणि चेन्नई यांच्यामध्ये लढत रंगली होती. या सामन्यांमध्ये राजस्थानच्या युसूफ पठाण याने अष्टपैलू खेळी केली होती. युसूफ पठाण स्वःतच्या बळावर राजस्थान रॉयल्सने पहिल्या आयपीएल चषकावर नाव कोरले होते.

IPL चे विजेते –

  • २००८ – राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स – राजस्थान
  • २००९ – डेक्कन चार्जस विरुद्ध रॉयल चॅलेंजर बंगलोर – डेक्कन चार्जस
  • २०१० – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – चेन्नई सुपर किंग्स
  • २०११ – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध आरसीबी – चेन्नई सुपर किंग्स
  • २०१२ – कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स – कोलकता नाईट रायडर्स
  • २०१३ – मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स – मुंबई इंडियन्स
  • २०१४ – कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स – कोलकता नाईट रायडर्स
  • २०१५ – मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स – मुंबई इंडियन्स
  • २०१६ – सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – सनरायजर्स हैदराबाद
  • २०१७ – मुंबई इंडियन्स विरुद्ध रायझिंग पुणे सुपरजायंट्स – मुंबई इंडियन्स
  • २०१८ – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद – चेन्नई सुपर किंग्स
  • २०१९ – मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स – मुंबई इंडियन्स
  • २०२० – मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – मुंबई इंडियन्स
  • २०२१ – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – चेन्नई सुपर किंग्स
  • २०२२ – गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स – गुजरात टायटन्स
  • २०२३ – गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स – कोण मारणार बाजी?

हे ही वाचा:

IPL २०२३ च्या फायनलला वरुणराजाची उपस्थिती ; वादळी वाऱ्यासह आगमन

IPL 2023 Final, आज रंगणार महामुकाबलाचा थरार… कोण पटकवणार IPL 2023 मान? जाणून घ्या सविस्तर माहिती

दिल्लीच्या जंतरमंतरवर कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये झाला राडा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss